Kadhi Lagel Re Vedhya Lyrics – Pralhad Shinde

कधी लागेल रे वेड्या Kadhi Lagel Re Vedhya Lyrics – Kadhi Lagel Re Vedhya is Song Sung by Pralhad Shinde.

Album : Aavad Bhajanachi
Song : Kadhi Lagel Re Vedhya
Singers : Pralhad Shinde
Music Label : Wings Marathi

Kadhi Lagel Re Vedhya Lyrics

तुझा ना भरोसा, आ
तुझा ना भरोसा ना माझा भरोसा
जग हे कुणाचे सांग भल्या माणसा

असो चूनमाती आणि मीठ भाकर
नाम हरीचे मुखी गोड साखर
सोडून दे रे धनाच्या तू लालसा
जग हे कुणाचे सांग भल्या माणसा

कधी लागेल, कधी
कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची
कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची
बघून घे सावळी मूर्ती आता त्या पांडुरंगाची

मनो भावे भजन तू कर
प्रभू च्या लाग चरणाला
प्रभू च्या लाग चरणाला
आ, मनो भावे भजन तू कर
प्रभू च्या लाग चरणाला
प्रभू च्या लाग चरणाला
करुण घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगाची
करुण घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगाची

असे हा जन्म मोलाचा, नको तू घालवू वाया
असे हा जन्म मोलाचा, नको तू घालवू वाया
नको तू घालवू वाया
आ, घालवू वाया

ये सखा,
अरे, तू सदा गा रे, सदा गा रे
सदा गा रे भूपाळी तू सकाळी त्या श्रीरंगाची
सदा गा रे भूपाळी तू सकाळी त्या श्रीरंगाची

धनाचा लोभ सोडून दे
धरी सन्मार्ग नेकीचा
धरी सन्मार्ग नेकीचा
धनाचा
धनाचा लोभ सोडून दे
धरी सन्मार्ग नेकीचा
धरी सन्मार्ग नेकीचा
जपून तू चाल, जपून तू चाल
जपून तू चाल रे वेड्या तुटेल ती दोर पतंगाची
जपून तू चाल रे वेड्या तुटेल ती दोर पतंगाची

मिळावी मुक्ती म्हणुनी भक्ती कर
भटकू नको जग भर
तर मिळावी
मिळावी मुक्ती म्हणुनी भक्ती कर
भटकू नको जग भर, वेड्या भटकू नको जग भर
तुला जाणीव, तुला जाणीव
ऐ, तुला जाणीव रे होईल आलेल्या घोर प्रसंगाची
तुला जाणीव रे होईल आलेल्या घोर प्रसंगाची

कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची
बघून घे सावळी मूर्ती आता त्या पांडुरंगाची
त्या माझ्या पांडुरंगाची
माझ्या पांडुरंगा…

You may also like...