Balkadu Powada Lyrics in Marathi From Marathi Movie Balkadu feat Umesh Kamat, Neha Pendse And Prasad Oak In Lead Roles.
Balkadu Powada Music Video
Balkadu Powada Credit
Movie : Balkadu Movie
Song : Balkadu Powada
Stars : Umesh Kamat, Neha Pendse And Prasad Oak
Director : Atul Kale
|| आहो राजे हो ||
|| जी र राजे हो जी जी… ||
स्वराज्याचे बांधू तोरण.. बांधू तोरण संधीपाहून
कोंढाणा किल्ला घ्यावा ताब्यात … अष्टमी मुहूर्त ठेवा ध्यानात
जिजाबाई भरल्या राजगडात जी…
|| आहो राजे हो ||
|| जी र राजे हो जी जी ||
कोंढाण्या सारखा बळकट किल्ला…
मोघलांच्या हाती अशण बरं नाही
ती आपली अस्मिता आहे …
प्रणाम केला मातेला … 2
आमंत्रण दिल सर्वांना …
सर्व मावळे लागले कामाला
शेलार मामा होते संगतीला …
एव्हढ्यात तानाजी मालुसरे कडून
रायबाच्या लग्नाच निमंत्रण घेऊन एक दूत महाराजांकडे आला
आणि तेव्हा परतीचा निरोप पाठविला
तानाजीला …
तुम्ही लागा लगीन कार्याला
आम्ही जातो लढाया घाईला
|| आहो राजे हो ||
|| जी र राजे हो जी जी ||
तानाजी मालुसरेला हे कळताच ते काई म्हणतात
आम्ही लग्नात वरंबाप म्हणून मिरवायचं
आणि आमच्या राज्याने लढायला जायचं हे कदाबी शक्य नाही
तानाजीने मनी केला पन आणि दिले बघा वचन
आधी करू लगीन कोंढाण्याचं नंतरच लग्न रायबाचं
घ्यावे एव्हढे ऐकुन जी जी जी जी
प्रणाम केला राजाला 2
तानाजी वीर चालला कमरेला बांधला शेला टाच
मारली बघा घोड्याला मारली घोड्याला जीर हा जी जी जी …
कोंढाण्याचे उंच शिखर …
रात किरकिर
मोठी अवघड गडावर जावे तरी कसे …
टाकावे कुणीकडुन फासे
आणि एव्हढ्यात तानाजी ने आपल्या पेटाऱ्यातून घोरपड बाहेर काढली
आणि त्या घोरपडीचे नाव काय माहिती आहे यशवंती …
यशवंती चाल .. घोरपड बांधली दोरीला …
यशवंती कुंकू वाहतो तुला
यावे आमच्या मदतीला …
गड येईल आमच्या हाताला …
वचन दिले आम्ही राजाला मावळे चढती वरतीला जागे होती स्वाभिमानाला
असे करून चढले कोंढाणा …
चढले कोंढाणा .. जीर हा जी जी जी …
त्यावेळी कोंढाण्याचा किल्लेदार होता उदयभान नावाचा राजपूत
ए .. उदयभान्या .. कोण तानाजी … हा तुझा बाप तानाजी
अरे तू इथे काय करतो आहेस शिवसेनेत
दिल्लीला चल मुजरा कर…
तुला किल्लेदार करतील ..
अरे चल हाट…
दिल्लीत जाऊन मुजरा करण्याची हलकट जात मराठ्यांची नाही
अरे मी एकवेळ मोडेल पण वाकणार नाही
अरे मराठी माणसांना ताठ कणा ठेवायला दोनच माणसांनी शिकवले
एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज
आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे
आणि मग तानाजीने वार बघ केला …
उदयभान बघा चवताळला
पलट वार त्याने बघा केला तानाजीच्या तोडलं ढालीला …
कमरेचा काढुनी शेला …
शेलावर घेती वाराला …
उदयभान खेळी साधला …
उदयभानच्या एका वाराला
तानाजीचा हात उडविला …
इंच इंच जखमा अंगाला
रक्ताने वीर न्हालेला …
रक्ताच्या थारोळ्यात तानाजीला बघून
अंशी वर्षाचे शेलार मामा उदयभानावर धावून आले
मामाने मारले उंटांनाना दात खाऊन केलं वाराला
रक्त बोट लागले तलवारीला …
छातीवर मामा बसलेला
दाताने फोडलं नरडीला …
सपासप करती वाराला
उभा चिरलं उदयभानाला हो …
उदयभानाला जीर हो जी जी… ||
Read Also
जिथ घुसतया मराठ्याच पोर Mard Marathyach Por
Zala Maharashtra Cha Raja Shivba Maza Lyrics
SHIVBA RAJA G BASLA GHODYAVARI LYRICS
Vajat Danka Daahi Dishela Lyrics – Chhatrapati Shivaji