शिवसेना गीत Shivsena Song Lyrics In Marathi

शिवसेना गीत Shivsena Song Lyrics by Avadhoot Gupte And Swapnil Bandodka is marathi song

Shivsena Song Lyrics

आम्ही शिवाचे सैनिक वेडे,
करू जीवाचे रान,

आम्ही शिवाचे सैनिक वेडे,
करू जीवाचे रान,

पण पुन्हा एकदा भारत देशा
बनवू हिंदुस्थान
आमचा हिंदुस्थान आमचा हिंदुस्थान

भगवे आमचे रक्त तळपतो,
तप्त हिंदवी बाणा..(x2 )
जात,गोत्र अन धर्म अमुचा
शिवसेना , शिवसेना ,शिवसेना

वरदान दिले शौर्याचे आई
भवानीने आम्हास…

वरदान दिले शौर्याचे आई
भवानीने आम्हास…

खडग घेऊनि हाती धरली
हिंदुत्वाची कास..!

लाल किल्यावर भगवा फडको …
लाल किल्यावर भगवा फडको …

हाच एकला ध्यास
महाराष्ट्र धर्म वाढवा
सांगतो शिवबाचा इतिहास
बस पुरे आता ना होऊनि देऊ
माणुसकीची देना

जात, गोत्र अन धर्म अमुचा
शिवसेना शिवसेना

धगधगता अग्नी चहूकडे
अन मार्ग निखार्याचा
जमला नाही कोणाला
तर दोष न तो त्याचा (x2)

अरे हिशेब आम्ही ठेवत नसतो
अशा भेकडाचा
वाघ एकला राजा
बाकी खेळ माकडाचा

घडवून दावू आम्ही
जे कोणास कधी जमले ना
जात , गोत्र अन धर्म अमुचा
शिवसेना , शिवसेना , शिवसेना

कायापालट कोणाचा या
आम्ही करूनी दावू

मराठवाड्याला हिरवा शालू
आम्ही नेसवून दावू

लचके तोडून पश्चिम घाटा
ज्यांनी हि निदले
धूळ चारुनी त्याना पुन्हा
सोने पिकवून दावू
विदर्भ आमची शान असे
अन मान असे आमुची
कशी छाटूनी देऊ?

आम्ही प्राण पणाला लावू
जळगाव असे हो आमुचे
जितके बेळगाव हि तितके
एकमुखाने महाराष्ट्राचे
गीत मराठी गाऊ

आठवा बॉम्बे चे या मुंबई
आम्ही हो केले ना ?

जात गोत्र अन धर्म अमुचा
शिवसेना , शिवसेना , शिवसेना 

You may also like...