Vitthalayachaya Payi Veet Lyrics – Prahlad Shinde

Vitthalachya Payi Veet lyrics by Prahlad Shinde from the album Paule Chalati Pandharichi Vaat, Vitthalachya Payi Veet lyrics written by Datta Patil and, music is given by Madhukar Pathak.

Vitthalachya Payi Veet lyrics

 विठ्ठलाच्या पायी वीट, झाली भाग्यवंत
विठ्ठलाच्या पायी वीट, झाली भाग्यवंत

पहाताच होती दंग, आज सर्व संत
विठ्ठलाच्या पायी वीट, झाली भाग्यवंत
विठ्ठलाच्या पायी वीट, झाली भाग्यवंत

युगे अठ्ठावीस उभा, विठू विटेवरी
धन्य झाली चंद्रभागा, धन्य ती पंढरी

अनाथांचा नाथ हरी, असे दयावंत
विठ्ठलाच्या पायी वीट, झाली भाग्यवंत
विठ्ठलाच्या पायी वीट, झाली भाग्यवंत

कुठली ती होती माती, कोण तो कुंभार
घडविता उभा राही, पहा विश्वंभर
तिच्यामुळे पंढरपूर, झाले कीर्तिवंत

विठ्ठलाच्या पायी वीट, झाली भाग्यवंत
विठ्ठलाच्या पायी वीट, झाली भाग्यवंत

पाहुनिया विटेवरती, विठू भगवंत
दत्त म्हणे मन माझे, होई येथे शांत
गुरुकृपे साधीयला मी, आज हा सुपंथ

विठ्ठलाच्या पायी वीट, झाली भाग्यवंत
विठ्ठलाच्या पायी वीट, झाली भाग्यवंत

 

You may also like...