Ved Tujha Lyrics by Ajay Gogavale is a Marathi song From Movie Ved starring Ritesh Deshmukh, Genelia Deshmukh with music given by Ajay-Atul while Ved Tujha song lyrics are penned by Guru Thakur.
Ved Tujha Lyrics
जीव उतावीळ अधीर
तुझ्याविणा राहीना…
आज तुझ्यातचं विरघळू दे ना
मिठीत तू घेना
अनवट उरी आग ही
तगमग अशी लावते
उधळूनी मी टाकले
तन मन ये ना….
वेड तुझा विरह वणवा…
वेड तुझा प्रणय हळवा…
वेड तुझे या जगण्याचा सूर झालेला…
नकळत देहातली थरथर जागते
अन् तव श्वासातला परिमळ मागते
जडले हळवेसे मन होई लाजरे
नयनी फुललेले सुख होई साजरे
अनवट उरी आग ही
तगमग अशी लावते
उधळूनी मी टाकले
तन मन ये ना….
वेड तुझा विरह वणवा…
वेड तुझा प्रणय हळवा…
वेड तुझे या जगण्याचा सूर झालेला…