Majha Bhimraya Lyrics is latest Bheemgeet
Majha Bhimraya Lyrics
क्रांतिसूर्य तू शिल्पकार तू भारताचा
बोधिसत्व, मूकनायका…
मोडल्या रूढी त्या परंपरा दिव्यतेजा
तूच सकल न्यायदायका
क्रांतिसूर्य तू शिल्पकार तू भारताचा
बोधिसत्व, मूकनायका…
मोडल्या रूढी त्या परंपरा दिव्यतेजा
तूच सकल न्यायदायका
जीवन तुझे आम्हास प्रेरणा,
दाही दिशा तुझीच गर्जना,
गर्जना! ||
भीमरायाSsss… माझा भीमराया,
भारताचा पायाSss… माझा भीमराया,
आला उद्धरायाSss… माझा भीमराया ||
स्पर्शिलेती ओंजळीने
खुले केले पाणी चादर तळ्याचे,
हक्क देऊन माणसाचे,
केले सोने पिढीतांच्या जीवनाचे,
शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा,
शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा,
मार्ग प्रगतीचा दावीला दीना! ||
भीमरायाSsss… माझा भीमराया,
भारताचा पायाSss… माझा भीमराया,
आला उद्धरायाSss… माझा भीमराया