Jaise Jayache Karma Taise lyrics by the Pralhad Shinde, Jaise Jayache Karma Taise Song written by Anant Patil and, music is given by Madhukar Pathak.
Jaise Jayache Karma Taise lyrics
जगी जीवनाचे सार घ्यावे जाणुनी सत्वर
जगी जीवनाचे सार घ्यावे जाणुनी सत्वर
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर
क्षणिक सुखासाठी अपुल्या कुणी होतो नीतिभ्रष्ट
कुणी त्यागी जीवन अपुले दुःख जगी करण्या नष्ट
देह करी जे जे काही, देह करी जे जे काही, आत्मा
भोगितो नंतर
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर (x3)
ज्ञानी असो की अज्ञान गती एक आहे जाण
मृत्यूला न चुकवी कुणी थोर असो अथवा सान
सोड सोड माया सारी आहे जग हे नश्वर
सोड सोड माया सारी आहे जग हे नश्वर
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर (x3)
मना खंत वाटुनी ज्याचे शुद्ध होई अंतःकरण
क्षमा करी परमेश्वर त्या जातो तयाला जो शरण
अंत पृथ्वीचा बघ आला, अंत पृथ्वीचा बघ आला, युगे
चालली झरझर
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर (x3)
जगी जीवनाचे सार घ्यावे जाणुनी सत्वर
जगी जीवनाचे सार घ्यावे जाणुनी सत्वर
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर