Nau Koticha Raja Lyrics – Bhim Jayanti 2023

Nau Koticha Raja Lyrics – Bhim Geet (नऊ कोटीचा राजा Lyrics In Marathi ) Jeevala Jeevacha Daan, Jai Bhim Song

Nau Koticha Raja Lyrics

नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुदस्स
बुद्धं सरणं गच्छामि
धम्म सरणं गच्छामि
संघं सरणं गच्छामि

राजा नऊ कोटीचा राजा
दयाळु दाता माझा
दयाळु दाता माझा आज पूजा गं
पूजा गं दयाळु दाता माझा आज पूजा गं

पोरं पिंपळ पारावर
राजगृहा परी सुंदर
ध्यानस्थ आसनावर
बसविला भिम भास्कर
बसविला भिम भास्कर

दर्शनास नारी नर
येतील गडे दिनभर
लगबगीनं तुम्ही जाजा
लगबगीनं तुम्ही जाजा जा पूजा गं
पूजा गं दयाळु दाता माझा आज पूजा गं

ज्याने रूढी-बंधनातून
काढिले तुम्हां ओढून
आठवून तयाचे ऋण
व्हा मुक्त तुम्ही त्यातून
व्हा मुक्त तुम्ही त्यातून

गाऊन तयाचे गुण
टाकावे गाव गर्जून
ही अशीच अरती गा जा
ही अशीच अरती गा जा जा पूजा गं
पूजा गं दयाळु दाता माझा आज पूजा गं

जाऊन स्मारकाकडे
जा पूजा पहाटे गडे
कशी रास फुलांची पडे
दरसाल पुण्य एवढे
दरसाल पुण्य एवढे

वर्षात दोनदा घडे
जा रांग लावण्या पुढे
फुल-हार घेऊनि ताजा
फुल-हार घेऊनि ताजा जा पूजा गं

पूजा गं दयाळु दाता माझा आज पूजा गं
पूजा गं दयाळु दाता माझा आज पूजा गं

You may also like...